मुंबई - अभिनेता कार्तिक आर्यन आणि किआरा आडवाणी या दोघांचीही 'भूल भूलैय्या २' मध्ये वर्णी लागली आहे. २००७ साली प्रदर्शित झालेल्या 'भूल भूलैय्या' चित्रपटाचा हा सिक्वेल आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटामधील कार्तिकचा लूक प्रदर्शित करण्यात आला होता. 'भूल भूलैय्या'मध्ये अक्षय कुमारने साकारलेल्या भूमिकेत तो झळकणार आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनाचीही तारीख जाहीर करण्यात आली आहे.
'भूल भूलैय्या २'चं दिग्दर्शन अनिस बझ्मी करत आहेत. या चित्रपटातील भूमिकेबाबत किआराने सांगितलं, की 'भूल भूलैय्याच्या सिक्वेलमध्ये भूमिका साकारण्यासाठी मी फार उत्सुक आहे. अनिस बझ्मी यांच्या दिग्दर्शनाखाली हा माझा पहिलाच चित्रपट आहे. भूल भूलैय्या हा चित्रपट मी पाहिलेला सर्वात हॉरर चित्रपट होता. या चित्रपटाच्या सिक्वेलमध्ये मला संधी मिळाल्यामुळे मी फार आनंदी आहे. शिवाय, कार्तिकसोबतही भूमिका साकारायला मिळणार असल्यामुळे मी फार उत्सुक आहे'.