सत्ता, खुर्ची, पॉवर आदी राजकारणातले शब्द. ‘खुर्ची’ पटकावण्यासाठी कराव्या लागणाऱ्या लटपटी खटपटी रोजच वर्तमानपत्रे आणि टेलिव्हिजन वरून कळत असतात. सत्ता हा शब्दच राजकारण सुरू होण्यास कारणीभूत आहे. राजकारणात मिळणाऱ्या सत्तेचा वापर प्रत्येकजण आपापल्या परीने करत असतो. हेच राजकारण आपल्याला हल्ली चित्रपटांच्या माध्यमातूनही पाहायला मिळत आहे. सत्तेमधील महत्वाचा भाग म्हणजे खुर्ची. आता याच ‘खुर्ची’ च्या खेळावर एक मराठी चित्रपट बनला आहे ज्याचं नाव देखील ‘खुर्ची’ च आहे. खुर्ची साठी राजकारणात होणारे डावपेच लवकरच ‘खुर्ची’ या सिनेमातून प्रेक्षकांसमोर येणार असून ‘आता खुर्ची आपलीच..’ या टॅगलाईन सह राजकीय नाट्याचा अंदाज दर्शविणारे ‘खुर्ची’ सिनेमाचे पोस्टर प्रदर्शित करण्यात आले.
राजकारणातील छक्केपंजे व राजकारण्यांचे डावपेच दिसणार ‘खुर्ची’तून! - ‘आराध्या मोशन फिल्म्स’ प्रस्तुत खुर्ची
राजकारणाचा लहान मुलांवर काय परिणाम होतो हे पहिल्यांदाच ‘खुर्ची’ या आगामी सिनेमातून मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे. ‘आता खुर्ची आपलीच..’ या टॅगलाईन सह हे पोस्टर राजकीय नाट्याचा अंदाज दर्शवीत आहे. या पोस्टर मध्ये खुर्ची साठी करण्यात आलेली लढाई उघडपणे पाहायला मिळत आहे.
![राजकारणातील छक्केपंजे व राजकारण्यांचे डावपेच दिसणार ‘खुर्ची’तून!](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-10869614-1089-10869614-1614861717406.jpg)
‘खुर्ची’