बहिण-भावाच्या नात्याचे निरागस भाव उलगडणारे 'खारी-बिस्किट' गाणं प्रदर्शित - क्षितीज पटवर्धन
अंध असलेल्या आपल्या बहिणीला आनंदी ठेवण्यासाठी तिचा लहानगा भाऊ कशाप्रकारे मेहनत घेतो, हे या गाण्यात पाहायला मिळते.
मुंबई -आजवर बहिण-भावाच्या नात्यावर बरेच चित्रपट मराठी सिनेसृष्टीत तयार झाले आहेत. मात्र, अल्पावधीतच दोन निरागस बालकलाकारांच्या 'खारी-बिस्किट' या गाण्याने चाहत्यांना वेड लावले आहे. दिग्दर्शक संजय जाधव सध्या त्यांच्या आगामी 'खारी- बिस्किट' चित्रपटावर काम करत आहेत. या चित्रपटातील बहिण-भावाच्या नात्याची गोड गुंफण उलगडणारं गाणं सध्या चाहत्यांची मने जिंकत आहे.
बालकलाकार वेदाश्री खादिलकर आणि आदर्श कदम यांना घेऊन संजय जाधव हे 'खारी-बिस्किट' चित्रपट तयार करत आहेत. या चित्रपटातील गाण्यात दोन्हीही बालकलाकारांचा निरागसपणा भाव खाऊन जातो.