महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

'केजीएफ' स्टार यशची लाडक्या लेकीसोबत धमालमस्ती, पाहा व्हिडिओ - yash news

यश आणि राधिका पंडित यांनी २०१६ साली लग्नगाठ बांधली होती. दोघांचीही भेट २००७ साली एका जाहिरातीदरम्यान झाली होती. अनेक वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर दोघांनी लग्नगाठ बांधली.

'केजीएफ' स्टार यशची लाडक्या लेकीसोबत धमालमस्ती, पाहा व्हिडिओ

By

Published : Sep 15, 2019, 8:29 PM IST

मुंबई - 'केजीएफ' स्टार यशने अलिकडेच त्याची मुलगी 'आयरा'चा एक क्यूट व्हिडिओ चाहत्यांसाठी शेअर केला आहे. त्याची मुलगी अवघ्या ९ महिन्यांची आहे. यश नेहमी तिचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असतो. डिसेंबर महिन्यात तिचा पहिला वाढदिवस आहे. त्यापूर्वी यशने तिच्यासोबतचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये ती यशसोबत धमाल मस्ती करताना पाहायला मिळते.

यश आणि राधिका पंडित यांनी २०१६ साली लग्नगाठ बांधली होती. दोघांचीही भेट २००७ साली एका जाहिरातीदरम्यान झाली होती. अनेक वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर दोघांनी लग्नगाठ बांधली.

हेही वाचा-धर्मेंद्र यांनी शेअर केला करणचा बालपणीचा फोटो

'केजीएफ' चित्रपटानंतर यशच्या लोकप्रियतेत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. आता तो या चित्रपटाच्या दुसऱ्या भागाची तयारी करत आहे. 'केजीएफ २' हा पहिल्या भागापेक्षा आणखी प्रेक्षकांची मने जिंकेल, असा विश्वास त्याने व्यक्त केला आहे. संजय दत्त देखील त्याच्यासोबत या चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटात तो 'अधीरा'ची भूमिका साकारेल.

हेही वाचा-'तुला मार्ग दाखवायला मी नेहमी तुझ्यासोबत असेल', अक्षयने मुलाला 'अशा' दिल्या शुभेच्छा!

ABOUT THE AUTHOR

...view details