मुंबई - कन्नडमधील बहुचर्चित चित्रपट 'KGF: Chapter 2' चा थिएटरिकल ट्रेलर सध्या सोशल मीडियावर ट्रेंड करत आहे. यश-स्टाररच्या ट्रेलरने २४ तासांत पाच भाषांमध्ये १०९ दशलक्ष व्ह्यूजसह सर्वाधिक पाहिलेला भारतीय ट्रेलर बनून विक्रम प्रस्थापित केल्याचे वृत्त आहे.
सोशल मीडियावर मोठी बातमी शेअर करताना निर्मात्यांनी अभिमानाने सांगितले की, ''रेकॉर्ड, रेकॉर्ड, रेकॉर्ड. रॉकीला ते आवडत नाही, तो टाळतो, पण रेकॉर्डला रॉकी आवडतो. तो त्यातून सुटू शकत नाही. कन्नड: 18 दशलक्ष, तेलगू: 20 दशलक्ष, हिंदी: 51 दशलक्ष, तमिळ: 12 दशलक्ष, मल्याळम: 8 दशलक्ष.''
अप्रतिम सिनेमॅटोग्राफी, धमाकेदार अॅक्शन आणि प्रशांत नीलचे अनपेक्षित दिग्दर्शन यावर प्रेक्षक, विशेषत: रॉकिंग स्टार यशचे चाहते फिदा झाले आहेत. या ट्रेलरने चित्रपटाला अधिक प्रसिद्धी दिली आहे.