बंगळुरु - 'केजीएफ' चित्रपटाला मिळालेल्या प्रचंड यशानंतर आता त्याच्या दुसऱ्या भागाची तयारी जोरात सुरु आहे. सिनेमाच्या दुसऱ्या चॅप्टरची सुरुवात सिनेमाच्या युनिटच्या उपस्थितीत करण्यात आली. अभिनेता यश यात मुख्य भूमिका साकारत आहे.
'केजीएफ' चॅप्टर दोनच्या लॉन्चिंग प्रसंगी अभिनेता यशसह अभिनेत्री श्रीनिधि शेट्टी, दिग्दर्शक प्रशांत नील आणि निर्माता विजय किरगंदूर, सिनेमॅटोग्राफर भुवन गौडा उपस्थित होते.