महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

बॉक्स ऑफिसवर 'केसरी'चा रंग अधिक गडद, तिसऱ्याच दिवशी केली ५० कोटींची कमाई - film

होळीच्या पर्वावर प्रदर्शित झालेला 'केसरी' चित्रपटाचा रंग बॉक्स ऑफिसवर आणखी गडद होताना दिसत आहे. तिसऱ्याच दिवशी या चित्रपटाने ५० कोटींचा गल्ला जमवत १०० कोटींकडे वाटचाल सुरू केली आहे.

बॉक्स ऑफिसवर 'केसरी'चा रंग अधिक गडद

By

Published : Mar 24, 2019, 8:11 PM IST

मुंबई - बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमारचा 'केसरी' चित्रपट २१ मार्चला प्रदर्शित झाला. पहिल्याच दिवशी २१ कोटींची कमाई करत हा चित्रपट या वर्षातील सर्वाधिक ओपनिंग करणारा चित्रपट ठरला. पहिल्या दिवसापासूनच या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. तिसऱ्याच दिवशी या चित्रपटाने ५० कोटींचा गल्ला जमवत १०० कोटींकडे वाटचाल सुरू केली आहे.


होळीच्या पर्वावर प्रदर्शित झालेला 'केसरी' चित्रपटाचा रंग बॉक्स ऑफिसवर आणखी गडद होताना दिसत आहे. पहिल्या दिवशी २१.०६ कोटी, दुसऱ्या दिवशी १६.७० कोटी तर तिसऱ्या दिवशी १८.७५ कोटींचा आकडा गाठत या चित्रपटाने आत्तापर्यंत ५६.५१ कोटीची कमाई केली आहे. रविवारपर्यंत हा आकडा ८० कोटींपर्यंत जाईल, असा अंदाज चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांनी व्यक्त केला आहे.


'केसरी' चित्रपट भारतात तब्बल ३६०० तर, जगभरात तब्बल ४२०० स्क्रिन्सवर झळकला आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन अनुराग सिंग यांनी केले आहे. अक्षयसोबत या चित्रपटात परिणीती चोप्रादेखील मुख्य भूमिकेत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details