मुंबई - 'दंगल फेम' जायरा वसिम हिने बॉलिवूड सोडण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर बॉलिवूडमधुन संमिश्र प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत. बऱ्याच कलाकारांनी तिच्या निर्णयाचे समर्थन केले आहे. तर, काहींनी मात्र, तिच्या या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे. अभिनेत्री रवीना टंडन हिनेदेखील सोशल मीडियावर एक ट्विट करून आपलं मत मांडलं आहे. या ट्विटद्वारे तिने तिला टोलाही लगावला आहे.
प्रतिकूल विचारसरणी तुमच्याकडेच ठेवा, रवीनाचा जायराला टोला - the sky is pink
जायरा वसिम हिने बॉलिवूड सोडण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर बॉलिवूडमधुन संमिश्र प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत. बऱ्याच कलाकारांनी तिच्या निर्णयाचे समर्थन केले आहे. तर, काहींनी मात्र, तिच्या या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे.
रवीनाने ट्विटरवर लिहिलेय, की, 'सर्वकाही (यश, प्रसिद्धी) दिल्यानंतरही अवघ्या दोन चित्रपटांची कारकिर्द असणारे या कलाविश्वाचे ऋणी नाहीत. तर, ठीक आहे. याने काहीच फरक पडत नाही. फक्त एकच इच्छा आहे, की त्यांनी अतिशय सुरेखपणे यातून काढता पाय घ्यावा आणि हे सर्व प्रतिकूल विचार स्वत:पुरताच सीमीत ठेवावेत', असं ट्विट तिने केलं आहे.
'बॉलिवूड इंडस्ट्रीने प्रत्येक कालकाराला बरंच काही दिलं आहे'. तसंच धर्माच्या नावाखाली बॉलिवूडमधुन सोडण्याचा निर्णय घेणाऱ्या जायरावर तिने नाराजी व्यक्त केली आहे.