मुंबई -सलमान खान आणि कॅटरिना कैफ यांची जोडी असलेला 'भारत' चित्रपट बॉक्स ऑफिसवर घवघवित यश मिळवत आहे. या चित्रपटात कॅटरिनाने साकारलेली 'कुमूद रैना' म्हणजे सलमानची 'मॅडम सर' ही भूमिका देखील चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहे. तिच्या या भूमिकेसाठी तिने बरीच मेहनत घेतली होती. तिचा 'कुमूद रैना' बनण्याचा प्रवास कसा होता, हे तिने एका व्हिडिओद्वारे शेअर केला आहे.
'असा' होता कॅटरिनाचा 'भारत'ची 'मॅडम सर' बनण्याचा प्रवास, पाहा व्हिडिओ - instagram
या चित्रपटात कॅटरिनाने साकारलेली 'कुमूद रैना' म्हणजे सलमानची 'मॅडम सर' ही भूमिका देखील चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहे. तिच्या या भूमिकेसाठी तिने बरीच मेहनत घेतली होती.
या व्हिडीओमध्ये 'भारत'मधील तिच्या भूमिकेबद्दल तिने तिचा अनुभव शेअर केला आहे. 'कुमूद रैना' ही व्यक्तीरेखा साकारण्यासाठी जून्या अभिनेत्रींचे लूकही पाहण्यात आले होते. दिग्दर्शक अली अब्बास जफरनेही तिच्या या भूमिकेविषयी अनुभव शेअर केला आहे. व्हिडीओ शेअर करताना कतरिनाने लिहिले आहे की, 'कुमुद रैना कायमच माझ्यासाठी खास असेल. हा अनुभव माझ्यासाठी अविस्मरणीय आहे. ही भूमिका करतानाच प्रत्येक क्षण मला आवडला. हा चित्रपट बनवण्यासाठी प्रत्येकानेच अथक मेहनत केली आहे'.
'भारत'मधील कॅटरिनाचे कुरूळे केसदेखील सध्या ट्रेण्ड बनले आहेत. तिच्या या चित्रपटातील साधा लूक प्रेक्षकांना भाळला. तसेच, सलमान- कॅटरिनाच्या जोडीलाही प्रेक्षकांची भरभरुन पसंती मिळत आहे.