मुंबई - अभिनेत्री कॅटरिना कैफने सोमवारी आपली प्रिय मैत्रिण आणि जब तक है जान चित्रपटातील सह-अभिनेत्री अनुष्का शर्मासोबत घालवलेल्या आनंदाच्या क्षणांचा एक फोटो शेअर केला आहे.
कॅटरिनाने इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या फोटोमध्ये ती अनुष्कासोबत सोफ्यावर बसून स्मितहास्य करताना दिसते. "@anushkasharma हा फोटो पाहून खूप आनंद झाला", असे तिने कॅप्शनमध्ये लिहिले आहे. अनुष्कानेही कॅटरिनाच्या पोस्टला उत्तर देऊन आनंद झाल्याचे म्हटले आहे.