मुंबई - अभिनेत्री कॅटरिना कैफ, ईशान खट्टर आणि सिद्धांत चतुर्वेदी यांनी सोमवारी जाहीर केले की आगामी 'फोन भूत' या हॉरर-कॉमेडी चित्रपटासाठी ते सज्ज आहेत. या तिघांनी आपल्या चाहत्यांसमवेत चित्रपटाचा पहिला लुक इन्स्टाग्रामवर शेअर केला, 2021 मध्ये हा चित्रपट प्रदर्शित होणार असल्याचे त्यांनी जाहीर केले.
या फोटोमध्ये कॅटरिना, सिद्धांत आणि ईशान यांनी पांढऱ्या रंगाचा शर्ट आणि काळ्या रंगाची पॅन्ट परिधान केल्याचे दिसते. "भूत संबंधित सर्व समस्यांसाठी एक स्टॉप-शॉप, २०२१ मध्ये #फोन भूत सिनेमागृहात वाजत राहणार आहे," असं कॅटरिनाने कॅप्शनमध्ये लिहिलं आहे.
इंस्टाग्रामवर सिध्दांत चतुर्वेदीने लिहिलेः "ट्रिपल ट्रबल इन भूत वर्ल्ड! डरना अलाऊड है, जोपर्यंत आपण वाटेत हसत नाही तोपर्यंत. #फोनभूत, 2021 मध्ये चित्रपटगृहात रिंग करणार आहे."
दुसरीकडे ईशानने आपल्या कॅप्शनमध्ये खुलासा केला की कोविड - १९ मध्ये लॉकडाऊन आणि करमणूक उद्योग बंद केल्यामुळे चित्रपटाचा पहिला लूक मार्चपासून "लॉक झाला" आहे.