महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

'अखियों से गोली मारे' गाण्याची सोशल मीडियावर क्रेझ, व्हिडिओ शेअर करून कार्तिकने मानले आभार - 'अखियों से गोली मारे' गाण्याची सोशल मीडियावर क्रेझ

कार्तिकने त्याचाही एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये या गाण्याच्या शूटिंगदरम्यानची धमाल पाहायला मिळते. फराह खानने या गाण्याचे कोरिओग्राफ केले आहे. अनन्या पांडेसोबत कार्तिकची केमेस्ट्रीदेखील या गाण्यात दिसून येते.

Kartik Aryan shared video of fans dance video on ankhiyon se goli mare song
'अखियों से गोली मारे' गाण्याची सोशल मीडियावर क्रेझ, व्हिडिओ शेअर करून कार्तिकने मानले आभार

By

Published : Nov 27, 2019, 7:20 PM IST

मुंबई -चॉकलेट बॉय कार्तिक आर्यन, भूमी पेडणेकर आणि अनन्या पांडे यांचा 'पती, पत्नी और वो' चित्रपटाचा रिमेक लवकरच प्रदर्शित होणार आहे. सध्या कार्तिक त्याच्या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. चाहत्यांमध्येही त्याची विशेष क्रेझ पाहिली जाते. त्यामुळेच त्याच्या या चित्रपटातील गाणं

'अखियों से गोली मारे' सोशल मीडियावर हिट झालं आहे. कार्तिकने स्वत: काही व्हिडिओ शेअर करुन आपल्या चाहत्यांचे आभार मानले आहे.

सोशल मीडियावर त्याच्या या गाण्याची लोकप्रियता पाहायला मिळत आहे. बऱ्याच जणांनी या गाण्यावरचा आपला डान्स व्हिडिओ पोस्ट केला आहे. त्यापैकी काही व्हिडिओ कार्तिकने त्याच्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केले आहेत.

हेही वाचा -कॅन्सरसोबत लढत असताना आयुष्मानने दिली खंबीर साथ - ताहिरा कश्यप

कार्तिकने त्याचाही एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये या गाण्याच्या शूटिंगदरम्यानची धमाल पाहायला मिळते. फराह खानने या गाण्याचे कोरिओग्राफ केले आहे. अनन्या पांडेसोबत कार्तिकची केमेस्ट्रीदेखील या गाण्यात दिसून येते.

या चित्रपटात कार्तिक आर्यन हा चिंटू त्यागीच्या भूमिकेत झळकणार आहे. तर, अनन्या त्याची प्रेयसी तपस्या आणि भूमी पेडणेकर त्याची पत्नी वेदिका त्रिपाठीच्या भूमिकेत दिसणार आहेत.

काही दिवसांपूर्वीच चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. या ट्रेलरही सोशल मीडियावर चांगला प्रतिसाद मिळाला आहे.

हेही वाचा -गंभीर दुखापत होऊनही शूटिंगसाठी परतली परिनीती, 'अशी' घेतेय मेहनत

ABOUT THE AUTHOR

...view details