मुंबई -बॉलिवूडचा चॉकलेट बॉय म्हणून आता कार्तिक आर्यनची ओळख निर्माण झाली आहे. बऱ्याच चित्रपटातून त्याने प्रेक्षकांची मने जिंकली आहे. त्यामुळे त्याची एक झलक पाहण्यासाठी चाहते त्याच्याभोवती गराडा घालतात.
सध्या तो लखनौ येथे त्याच्या आगामी 'पती पत्नी और वो'च्या रिमेकमध्ये व्यग्र आहे. येथे त्याची झलक पाहण्यासाठी बऱ्याच मुलींनी गर्दी केली होती. त्यावेळी एका चाहतीने संधी साधुन त्याचे गाल ओढले. यावेळी कार्तिकच्या चेहऱ्यावर फारच क्युट हावभाव आहेत. त्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
कार्तिकच्या भोवती गराडा घातलेल्या तरुणींपैकीच एका तरुणीने त्याचे गाल ओढल्यावर तिच्याही आनंदाला पारावार उरला नाही. हा व्हिडिओ व्हायरल होत असलेला पाहुन कार्तिकनेही त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडिओ शेअर केला आहे.
कार्तिक आता बऱ्याच चित्रपटांच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. तो सारा अली खानसोबत 'आजकल' चित्रपटातही दिसणार आहे. तर, सध्या तो 'पती पत्नी और वो'च्या रिमेकची शूटिंग करत आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत अनन्या पांडे आणि भूमी पेडणेकर मुख्य भूमिकेत झळकणार आहेत.
याशिवाय 'दोस्ताना'च्या सिक्वेलमध्येही त्याची वर्णी जान्हवी कपूरसोबत लागली आहे.