मुंबई -बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यन, भूमी पेडणेकर आणि अनन्या पांडे यांच्या 'पती पत्नी और वो' या चित्रपटाची सध्या शूटिंग सुरू आहे. हा चित्रपट संजीव कुमार यांच्या चित्रपटाचा रिमेक आहे. कार्तिक आर्यन या चित्रपटात 'चिंटू त्यागी' ही भूमिका साकारत आहे. तर, भूमी पेडणेकर त्याच्या पत्नीच्या रुपात दिसणार आहे. या दोघांचाही फर्स्ट लूक नुकताच सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे.
कार्तिकच्या फोटोवर 'पती' असे कॅप्शन देऊन त्याचा चिंटू त्यागीच्या रुपातील फोटो शेअर करण्यात आला आहे. 'लिजिये खतम हो गया इंतजार, आ गये हालात के शिकार', अशी टॅगलाईनही त्याच्या फोटोवर पाहायला मिळतो.
तर, दुसरीकडे भूमी पेडणेकरचाही लूक प्रदर्शित करण्यात आला आहे. ती या चित्रपटात शिक्षिकेच्या रुपात दिसणार आहे. तिच्या हातात भौतिकशास्त्राचं पुस्तक असल्याचं पाहायला मिळतं. 'जरा हाय मेंटेनन्स है हम इमोशनली', अशी टॅगलाईन तिच्या फोटोवर देण्यात आली आहे.