मुंबई -अभिनेता सनी सिंगची मुख्य भूमिका असलेला 'उजडा चमन' हा चित्रपट १ नोव्हेंबरला प्रदर्शित झाला आहे. अलिकडेच मुंबईत या चित्रपटाच्या स्पेशल स्क्रिनिंगचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी बॉलिवूड कलाकारांनी आपली हजेरी लावली होती.
सनीने 'सोनू के टिटू की स्विटी' या चित्रपटात भूमिका साकारली होती. यामध्ये कार्तिक आर्यन आणि नुसरत भरुचा यांचीही मुख्य भूमिका होती. या चित्रपटात सनीने 'टिटू' म्हणजे कार्तिक आर्यनच्या मित्राची भूमिका साकारली होती. त्यामुळे सनीच्या 'उजडा चमन' या चित्रपटाच्या स्पेशल स्क्रिनिंग दरम्यान कार्तिक आणि नुसरतने विशेष हजेरी लावली होती.
हेही वाचा -प्रियंकाने फ्रोझन २ मधील एल्सा आणि अन्नाची करुन दिली ओळख, व्हिडिओ व्हायरल