मुंबई - बॉलिवूडचा चॉकलेट बॉय कार्तिक आर्यन सध्या त्याच्या 'पती, पत्नी और वो' या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. तसेच यातील गाणीही सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. यापैकी 'धिमे धिमे' या गाण्याची दिवसेंदिवस क्रेझ वाढताना दिसत आहे. प्रमोशनमध्येही याच गाण्याला चांगला प्रतिसाद मिळतो आहे. अगदी दीपिका पदुकोणनेही या गाण्यावर ठेका धरत विमानतळावरच डान्स केला.
अलिकडेच दीपिका आणि कार्तिक आर्यनला मुंबई विमानतळावर स्पॉट करण्यात आले. त्यांचा एक व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. दोघेही या व्हिडिओमध्ये कार्तिकच्या चित्रपटातील 'धिमे धिमे' गाण्यावर ठेका धरताना दिसत आहेत.
हेही वाचा -सदाशिवराव-पार्वतीबाईंच्या विवाह सोहळ्याची खास झलक, पाहा 'पानिपत'चं नवं गाणं