मुंबई -कार्तिक आर्यन आणि सारा अली खान यांची जोडी 'लव्ह आज कल -२' या चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटाच्या सेटवरचे बरेचसे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. कार्तिक आणि सारा एकत्र या चित्रपटात भूमिका साकारणार असल्यामुळे चाहत्यांनाही या चित्रपटाबद्दल उत्सुकता आहे. नुकतेच या चित्रपटाचे उदयपूर येथील शेड्यूल पूर्ण झाले आहे. कार्तिक आर्यनने दिग्दर्शक इम्तियाज अलीसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
'लव्ह आज कल'च्या सिक्वेलचे उदयपूर येथील शूटिंग पूर्ण, कार्तिकने शेअर केले फोटो
'सोनू के टिट्टू की स्विटी', 'प्यार का पंचनामा', 'लुकाछुपी' या चित्रपटातून कार्तिकने चाहत्यांवर छाप पाडली आहे. तर सारानेही आपल्या 'केदारनाथ' आणि 'सिम्बा' चित्रपटातून ओळख निर्माण केली आहे. या चित्रपटातील तिच्या भूमिकेचे कौतुकही झाले. आता दोघेही 'लव्ह आज कल'च्या सिक्वेलमध्ये दिसणार आहेत.

कार्तिकने इम्तियाज सोबतचे फोटो शेअर करुन उदयपूरमधील शूटिंगचा अनुभव शेअर केला आहे. या फोटोंध्ये कार्तिकचा नवा लूकही पाहायला मिळतो आहे. उदयपूरचे वातावरण, जेवण आणि ठिकाणं सर्वांनी माझ्यावर भूरळ पाडली आहे, असे त्याने या पोस्टद्वारे म्हटले आहे.