मुंबई- बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यन आणि सारा अली खान लवकरच 'लव्ह आज कल' चित्रपटाच्या सिक्वलमध्ये स्क्रीन शेअर करताना दिसणार आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून याबद्दलचे वृत्त समोर येत होते. मात्र, याबद्दल कोणतीही अधिकृत घोषणा झाली नव्हती. अशात आता कार्तिकने आपल्या चाहत्यांना याबद्दलची माहिती दिली आहे.
कार्तिकने शेअर केला सारासोबतचा सेटवरील फोटो - photo
साराने कार्तिकसोबतचा फोटो शेअर करत इम्तियाज अलीसोबत काम करण्यासाठी उत्सुक असल्याचे म्हटले आहे
कार्तिकने चित्रपटाच्या सेटवरील सारासोबतचा एक फोटो शेअर केला आहे. याच्या कॅप्शनमध्ये त्याने सारासोबत स्क्रीन शेअर करणार असून माझ्या आवडता दिग्दर्शक इम्तियाज अलीसोबत काम करण्याची संधी मिळाली असल्याचे सांगितले आहे. यासोबतच चित्रीकरणाला सुरूवात झाली असल्याचेही स्पष्ट केले आहे.
हा चित्रपट २०२० मध्ये १४ फेब्रुवारीला प्रदर्शित होणार आहे. तर सारानेही फोटो शेअर करत इम्तियाज अलीसोबत काम करण्यासाठी उत्सुक असल्याचे म्हटले आहे. कॉफी विथ करणमध्ये साराने कार्तिकला डेट करण्याची इच्छा बोलून दाखवली होती. आता या चित्रपटाच्या निमित्ताने का होईना तिची ही इच्छा काहीशी पूर्ण झाली आहे, असे म्हणणे वावगे ठरणार नाही.