महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

आईवडिलांकडून कार्तिकला मिळालं खास सरप्राईज, 'असा' साजरा केला वाढदिवस - Kartik Aaryan upcomming films

कार्तिकने हा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोवर चाहत्यांनीही प्रतीक्रिया दिल्या आहेत.

आईवडिलांकडून कार्तिकला मिळालं खास सरप्राईझ, 'असा' साजरा केला वाढदिवस

By

Published : Nov 22, 2019, 5:05 PM IST

मुंबई -बॉलिवूडचा हॅन्डसम हंक कार्तिक आर्यन आज २९ वा वाढदिवस साजरा करत आहे. आपल्या आईवडिलांकडून त्याला वाढदिवसानिमित्त खास सरप्राईज मिळालं. त्याच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे.

कार्तिक सध्या एकापाठोपाठ एक अशा बऱ्याच चित्रपटांमध्ये झळकणार आहे. त्याच्या वाढदिवसाच्या दिवशी त्याच्या आईवडिलांना सरप्राईझ भेट देऊन त्याचा वाढदिवस साजरा केला. यावेळी त्यांनी खास सजावटही केली होती. तसेच केक कापून वाढदिवसाचा आनंद लुटला.

हेही वाचा -हॅप्पी बर्थडे कार्तिक आर्यन....

कार्तिकने हा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोवर चाहत्यांनीही प्रतीक्रिया दिल्या आहेत.

आईवडिलांकडून कार्तिकला मिळालं खास सरप्राईझ
वर्कफ्रंटबाबत सांगायंच तर, कार्तिकचा 'पती, पत्नी और वो' हा चित्रपट सध्या प्रदर्शनाच्या वाटेवर आहे. यामध्ये त्याच्यासोबत अनन्या पांडे, भूमी पेडणेकर यांची भूमिका पाहायला मिळणार आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. आता तो 'दोस्ताना २'च्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे.

हेही वाचा -'द बॉडी' चित्रपटातील दुसरं रोमॅन्टिक गाणं प्रदर्शित, पाहा इमरान हाश्मी- वेदिकाची केमेस्ट्री

ABOUT THE AUTHOR

...view details