महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

'जो तुम ना हो रहेंगे हम नही', चाहत्यांच्या अफाट प्रेमाने भारावला कार्तिक आर्यन - Kartik Aaryan in love aaj kal

चित्रपटाच्या शूटिंगसाठी जात असताना कार्तिकला चाहत्यांनी चारही बाजुंनी घेरले होते.

Kartik Aaryan 'overwhelmed' by fans love, Kartik Aaryan mobbed by a sea of fans, Kartik Aaryan craze in fance, Kartik Aaryan latest news, Kartik Aaryan upcoming film, Kartik Aaryan in love aaj kal, Kartik Aaryan share video with fans
'जो तुम ना हो रहेंगे हम नही', चाहत्यांच्या अफाट प्रेमाने भारावला कार्तिक आर्यन,

By

Published : Jan 25, 2020, 3:26 PM IST

मुंबई -अल्पावधीतच चाहत्यांच्या गळ्यातील ताईत बनलेला कार्तिक आर्यन सध्या लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. त्याची एक झलक पाहण्यासाठी त्याच्याभोवती चाहत्यांची अफाट गर्दी जमलेली पाहायला मिळते. याचाच एक प्रत्यय म्हणून कार्तिकने एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये कार्तिक चाहत्यांच्या गर्दीमध्ये फसलेला दिसतो. त्यांचं एवढं प्रेम पाहून कार्तिक भारावला आहे.

कार्तिकने हा व्हिडिओ पोस्ट करून 'जो तुम ना हो रहेंगे हम नही', असे कॅप्शन या व्हिडिओवर दिले आहे. त्याच्या एका चित्रपटाच्या शूटिंगसाठी जात असताना त्याला चाहत्यांनी चारही बाजुंनी घेरले होते. या गर्दीतून कार्तिकला हलताही येत नव्हते. मात्र, तरीही त्याने चाहत्यांसोबत सेल्फी घेतल्या. तसेच, चाहत्यांच्या या प्रेमासाठी त्यांचे आभार मानले आहेत.

हेही वाचा -सोहा-कुणालच्या नवाबी विवाहसोहळ्याची खास झलक, पाहा व्हिडिओ

सध्या कार्तिक त्याच्या आगामी 'लव्ह आज कल' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत अभिनेत्री सारा अली खान आणि आरुषी शर्माची मुख्य भूमिका पाहायला मिळणार आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे.

या चित्रपटाशिवाय तो 'भूल भूलैय्या २', 'दोस्ताना २' यांसारख्या चित्रपटांमध्येही मुख्य भूमिकेत दिसणार आहे. त्यापूर्वी त्याचा 'लव्ह आज कल' हा चित्रपट १४ फेब्रुवारीला सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे.

हेही वाचा -धर्मेंद्र यांनी शेअर केला शेती आणि फार्म हाऊसचा व्हिडिओ

ABOUT THE AUTHOR

...view details