महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

हंगेरीतील विशेष मुलांच्या माहितीपटाला करिष्मा कपूरने दिली साथ - Special child help

हंगेरीतील विशेष मुले भारताच्या दौऱ्यावर आली होती. त्यांचा माहितीपट इथे दाखवण्यात आला. अभिनेत्री करिष्मा कपूरने त्यांना मदतीचा हात दिला.

हंगेरीतील मुलांसाठी करिष्माची मदत

By

Published : May 7, 2019, 8:20 PM IST


आपल्या देशात आजही एकूण लोकसंख्येच्या 13.7 टक्के लोक ही कोणत्या ना कोणत्या मानसिक विकाराने त्रस्त आहेत. जागतिक आरोग्य संघटनेच्या नव्याने प्रसिद्ध झालेल्या पत्रकात ही संख्या प्रत्येक चार व्यक्तीपैकी एका व्यक्ती मध्ये मानसिक आजार दिसून येत असल्याचे समजतंय. मानसिकदृष्ट्या विशेष असलेल्या मुलांच्या 'लॅन्ड युअर आईज बेल्टझर्स' या लघुपटाला अभिनेत्री करिष्मा कपूर हिने आपला पाठींबा दर्शवला.

हंगेरीतील मुलांसाठी करिष्माची मदत

हंगेरीतील विशेष मुलांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आणि कलेच्या माध्यमातून त्याच्यावर उपचार करण्याचा प्रयत्न बेल्टझर्स थिएटर द्वारे करण्यात आला. 1998 साली स्थापना झालेल्या या ग्रुपमध्ये आजमितीला अनेक विशेष मुलं या संस्थेत काम करतात. या नाट्यसंस्थेच्या माध्यमातून जगभर ते नाटकाचे प्रयोग सादर करतात. या नाट्यसंस्थेचं भारताशी नाते जुळलं ते योगाच्या निमित्ताने. नियमित्तपणे योगा शिकण्यासाठी ते भारतात आले आणि भारतीय संस्कृतीने त्यांना एक वेगळीच भुरळ घातली.

2015 साली भारतात येऊन त्यानी अनेक ठिकाणी हे नाट्यप्रयोग सादर करायला सुरुवात केली. त्यानंतर भारत भ्रमण करावं असही त्यांना वाटू लागलं. अखेर तामिळनाडूतील वैटेश्वरम कोली या मंदिराला भेट देण्याचा निर्णय त्यांनी घेतला आणि हा संपूर्ण प्रवास त्यांनी या लघुपटाच्या माध्यमातून जगासमोर मांडला.

2018 साली या लघुपटाला जयपूर आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनाचा पुरस्कार मिळाला. त्यानंतर त्याच प्रदर्शन जागोजागी करण्याचा निर्णय हंगेरी सरकारने घेतला. त्यासोबत हा लघुपट तमिळ आणि हिंदी भाषेत डब करण्यात आला.

विशेष मुलांना घेऊन अशा पद्धतीने काम करणाऱ्या नाट्य संस्थेला मदत करता यावी यासाठी या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्याचे करिष्मा कपूरने सांगितलं. या माध्यमातून होत असलेले काम हे खरच कौतुकास्पद असल्याचं मत सगळ्याच मान्यवरांनी व्यक्त केलं.

ABOUT THE AUTHOR

...view details