मुंबई -भारताने १९९९ साली कारगिल युद्धात पाकिस्तानवर अविस्मरणीय विजय मिळवला होता. भारत आणि पाकिस्तानमध्ये तब्बल ६० दिवस हे युद्ध सुरू होते. अखेर २६ जुलैला भारताने पाकिस्तानला मात देत विजयश्री मिळवली होती. तेव्हापासून २६ जुलै हा दिवस 'कारगिल दिवस' म्हणून साजरा केला जातो.
कारगिल युद्धात भारतीय सैन्याचे ५२७ जवान शहीद झाले होते. तर, १३६३ जवान जखमी झाले होते. या युद्धाला यावर्षी २० वर्षे पूर्ण होत आहेत. कारगिल युद्धाचा थरार बॉलिवूडच्याही चित्रपटातून प्रेक्षकांसमोर उलगडण्यात आला. हे चित्रपट पाहताना प्रेक्षकांच्याही अंगावर रोमांच उभे राहतात.
एलओसी कारगिल -कारगिल युद्धाच्या तीन वर्षानंतर म्हणजे २००३ साली 'एलओसी कारगिल' हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात बॉलिवूडची तगडी स्टारकास्ट झळकली होती. अजय देवगन, संजय दत्त, सैफ अली खान, अभिषेक बच्चन, करिना कपूर आणि सुनील शेट्टी यांच्या या चित्रपटात भूमिका होत्या.