मुंबई- बॉलिवूडची प्रसिद्ध जोडपे अभिनेत्री करिना कपूर आणि सैफ अली खान यांच्या लग्नाला 8 वर्ष पूर्ण झाली आहेत. लग्नाच्या वाढदिवसानिमित्य करिनाने आपल्या पतीसाठी भावूक संदेश लिहिला आहे.
करिनाने उलगडले सैफसोबतच्या आनंदी संसाराचे रहस्य - सैफ-करिनाचा सुखाचा संसार
करिना कपूर आणि सैफ अली खानच्या विवाहाला ८ वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यांचा सुखाचा संसार सुरू असून याचे रहस्य करिनाने उलगडले आहे. तिने पतीसाठी एक भावूक संदेश लिहिला आहे.
करिना कपूर आणि सैफ अली
करिनाने तिच्या इंस्टाग्रामवर लिहिलंय, "एकेकाळी बेबो नावाची मुलगी आणि सैफू नावाचा मुलगा होता. दोघांनाही स्पेगेटी आणि वाइन खूप आवडत असे आणि दोघेही आनंदाने राहत होते. तेव्हा तुम्हाला कळले असेल की आनंदी दांपत्याच्या आनंदाचे रहस्य. लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, एसएकेपी...!"
सैफ आणि करिनाने 16 ऑक्टोबर 2012 रोजी लग्नगाठ बांधली होती. २०१६ मध्ये त्यांच्या घरी छोट्या तैमूर अली खानची एन्ट्री झाली होती. करिना आता दुसऱ्या मुलाची आई होणार आहे.