महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

करिना कपूरने शेअर केला ऋषी कपूर आणि पतौडी यांचा दुर्मिळ फोटो - Rishi Kapoor and Mansur Ali Khan photo

करिना कपूर हिने आपले चुलते ऋषी कपूर आणि सासरे मन्सूर अली खान पतौडी यांचा एक जुना फोटो शेअर केला आहे. दोघेही या फोटोत क्रिकेटच्या मैदानात दिसत आहेत.

Rishi Kapoor and Mansur Ali Khan photo
ऋषी कपूर आणि पतौडी

By

Published : May 1, 2020, 7:23 PM IST

मुंबई - अभिनेत्री करिना कपूर आपले काका ऋषी कपूर यांच्या निधनानंतर अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर करीत आहे. तिने आता एक शेअर केलेला फोटो क्रिकेटच्या मैदानातला आहे. यात तिचे सासरे नवाब मन्सूर अली खान पतौडी आणि ऋषी कपूर मैदानात दिसत आहेत. हा फोटो खूप जुना असून दोघेही खूप सुंदर दिसत आहेत. या फोटोवर तिची बहिण करिश्मासह अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.

ऋषी कपूर यांचे ३० एप्रिल रोजी सकाळी पावने नऊ वाजता निधन झाले. गेल्या काही महिन्यापासून ते दुर्धर आजाराशी झुंझत होते. त्यांना श्वास घ्यायला त्रास सुरू झाल्यानंतर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर काल अंत्यसंस्कार पार पडले. त्यांची मुलगी रिद्धीमा मुंबईत पोहोचू शकली नव्हती. ती आज दाखल होणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details