मुंबई - करिना कपूरचा बॉलिवूड प्रवास अत्यंत रंजक राहिला आहे. गेली २ दशके ती विविध सिनेमातून भूमिका साकारत आहे. तणावात काम न करता आपल्या अटींवर काम करणाऱ्या अभिनेत्रींपैकी ती एक आहे. ती 'हिंदी मीडियम २' या आगामी चित्रपटात इरफान खानसोबत झळकणार आहे. आजपर्यंत न साकारलेली व्यक्तीरेखा ती यात साकारणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार करिना कपूर यात पोलिसाची भूमिका करीत आहे. हा चित्रपट साकारण्यासाठी ती खूपच उत्सुक आहे. काही वर्षांपासून ती आपल्या भूमिकांमध्ये वैविध्य आणण्यासाठी प्रयोग करीत आहे. २०१८ मध्ये तिने वीरे दी वेडिंगमध्ये फेमिनिस्टच्या भूमिकेत दिसली होती.