महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

चक्क विमानतळावरच करिनाला करावं लागलं मेकअप, व्हिडिओ व्हायरल - Kareena kapoor latest news

करिना कपूरचा चुलत भाऊ आणि अभिनेता अरमान जैन याच्या रोका सोहळ्याचं आयोजन करण्यात आले होते. मुंबईमध्ये हा सोहळा पार पडलाय. यादरम्यान कपूर कुटुंबातील कलाकारांनी हजेरी लावली होती. दरम्यान करिनाच्या लूकनेही सर्वांचे लक्ष वेधले.

Kareena kapoor makeup video at bengaluru airport goes viral
चक्क विमानतळावरच करिनाला करावं लागलं मेकअप, व्हिडिओ व्हायरल

By

Published : Dec 15, 2019, 5:52 PM IST

Updated : Dec 16, 2019, 12:00 AM IST


मुंबई -बॉलिवूडची बेबो म्हणजेच करिना कपूर खान आपल्या फॅशनसेन्स आणि स्टाईल स्टेटमेंटसाठी लोकप्रिय आहे. आपल्या लूकने ती सर्वांना आकर्षित करत असते. मात्र, तिचा चक्क विमानतळावर मेकअप करतानाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

यामागचं कारण म्हणजे, करिना कपूरचा आतेभाऊ आणि अभिनेता अरमान जैन याच्या रोका सोहळ्याचं आयोजन करण्यात आले होते. मुंबईमध्ये हा सोहळा पार पडलाय. यादरम्यान कपूर कुटुंबातील कलाकारांनी हजेरी लावली होती. दरम्यान करिनाच्या लूकनेही सर्वांचे लक्ष वेधले.

करिना बंगळुरू येथे एका कार्यक्रमासाठी गेली होती. तिथून तिला लगेच अरमानच्या रोका सोहळ्यासाठी तयार व्हायचं होतं. मात्र, तिच्याकडे पुरेसा वेळ नसल्यामुळे तिने बंगळुरूच्या विमानतळावरच आपल्या मेकअप आर्टिस्टकडून मेकअप करून घेतला. लाल रंगाच्या लेहंग्यामध्ये ती अतिशय सुंदर दिसत होती.

अरमान जैनच्या रोका सेरेमनीमध्ये करिश्मा कपूरदेखील आपल्या दोन्ही मुलांसह उपस्थित होती. तिची आई बबीता कपूर, ऋषी कपूर आणि नितू कपूर यांनीही यावेळी हजेरी लावली होती. अभिनेत्री कियारा आडवाणी आणि तारा सुतारीया यांनीही आपल्या लूकने सर्वांचे लक्ष वेधले.

अरमानने त्याची गर्लफ्रेंड अनीसा मल्होत्रा हिच्यासोबत लवकरच लग्नगाठ बांधणार आहे. अरमान हा राज कपूर यांची मुलगी रीमा जैन यांचा मुलगा आहे.
Last Updated : Dec 16, 2019, 12:00 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details