महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

आलिया - रणबीरच्या नात्यावर काय म्हणाली करिना? - Kareena kapoor latest news

अलीकडेच करिनाने आलिया भट्ट सोबत 'मामी मुव्ही मेला' या कार्यक्रमात हजेरी लावली होती. दरम्यान करिनाला रणबीर आणि आलियाबद्दल प्रश्न विचारण्यात आला.

आलिया - रणबीरच्या नात्यावर काय म्हणाली करिना?

By

Published : Oct 15, 2019, 9:42 AM IST

मुंबई - बॉलिवूडमध्ये बऱ्याच दिवसांपासून आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांच्या नात्याची चर्चा पाहायला मिळते. त्यांच्या लग्नाच्याही चर्चांचे वारे सध्या जोरात वाहू लागले आहेत. तसंच, वेगवेगळ्या कार्यक्रमात दोघेही सोबतच हजेरी लावतात. त्यामुळे लवकरच ते लग्नगाठ बांधणार असल्याच्या चर्चा सध्या बॉलिवूडमध्ये सुरू आहेत. अशातच करिना कपूर खान हिनेही त्यांच्या नात्याबाबत आपली प्रतिक्रिया दिली आहे.

अलिकडेच करिनाने आलिया भट्ट सोबत 'मामी मुव्ही मेला' या कार्यक्रमात हजेरी लावली होती. दरम्यान करिनाला रणबीर आणि आलियाबद्दल प्रश्न विचारण्यात आला. यावर ती म्हणाली, की 'मी खूप भाग्यशाली असेल, आलिया माझी वहिनी झाली तर'.

हेही वाचा -चांगली अभिनेत्री बनण्यासाठी श्रीदेवींच्या 'या' टीप्स फॉलो करते जान्हवी

यावर आलियानेही म्हटले की, 'प्रामाणिकपणे सांगायचं झालं तर, मी अजून याबाबत विचार केला. जेव्हा वेळ येईल तेव्हा सर्व गोष्टी पार पडतील'. करिना आणि आलियाच्या या उत्तरामुळे पुन्हा आलिया आणि रणबीरच्या लग्नाच्या चर्चांना हवा मिळाली आहे.

वर्कफ्रंटबाबत सांगायंच तर, करिना आणि आलिया दोघीही करण जोहरच्या 'तख्त' चित्रपटात झळकणार आहेत.

हेही वाचा -‘जेव्हा सैराटला भेटते धडक’

ABOUT THE AUTHOR

...view details