महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

करिना शूटिंगसाठी सज्ज, शेअर केली टीमसोबतची झलक - करिना कपूरने पुन्हा शूटिंगसोठी सज्ज

करिना कपूरने पुन्हा शूटिंगसोठी सज्ज होत असतानाचा फोटो पोस्ट केला आहे. यात तिची संपूर्ण टीम दिसत आहे. काही वेळातच या फोटोला प्रचंड लाईक्स मिळाले आहेत.

Kareena Kapoor
करिना कपूर

By

Published : Aug 25, 2020, 8:16 PM IST

मुंबई - लॉकडाऊननंतर पुन्हा पूर्ववत गोष्टी सुरळीत होत आहेत. अभिनेत्री करिना कपूर-खानने मंगळवारी आपल्या टीमसोबतचा एक फोटो पोस्ट करुन न्यू नॉर्मलसाठी सज्ज होत असल्याची झलक दाखवली आहे.

तिच्या योद्धाच्या मदतीने शूटसाठी तयार झाल्याचा एक ग्लॅमरस फोटो करिनाने इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे. फोटोत करिना टिमसोबत आरशात पाहताना दिसत आहे.

फोटोमधील सर्वांनी मास्क परिधान केला असून करिनासाठी ते पुन्हा पूर्ववत कामासाठी सज्ज झालेले दिसत आहेत.

हेही वाचा - एस एस राजामौलीच्या चित्रपटातून आलिया भट्टला वगळले, जागा घेणार प्रियंका चोप्रा?

या पोस्टला केवळ १८ मिनिटातच ७६ हजार लोकांनी लाईक केले आहे. बॉलिवूडच्या अनेक सेलेब्रिटीजनाही हा फोटो आवडला आहे. यामध्ये अनन्या पांडे आणि इतरांचा समावेश आहे. यापूर्वी गणेश चतुर्थी रोजी करिनाने सोशल मीडियावर पोस्ट केलेला तैमुरचा फोटो चाहत्यांना आवडला होता.

ABOUT THE AUTHOR

...view details