मुंबई - निर्माता करण जोहरने शनिवारी आपल्या टीमसोबत 'तख्त' सिनेमाच्या लोकेशनवर शिक्कामोर्तब केला. लोकेशनचा शोध संपल्याचेही करणने म्हटले आहे.
करण जोहर आणि त्याच्या धर्मा प्रॉडक्शनच्या टीमने ताजमहल समोर उभे राहून एक फोटो घेतला. हेच आपले आगामी 'तख्त' सिनेमाचे लोकेशन असणार असल्याचे कळवले आहे.
'तख्त' सिनेमाच्या शूटींगच्या पहिल्या टप्प्याला फेब्रुवारी महिन्यात सुरुवात होणार आहे. चित्रपटाची कथा शाहजहाचा पहिला मुलगा दारा शिकोह आणि तिसरा मुलगा औरंगजेब यांच्यातील लढाईची आहे. दारा शिकोहची भूमिका रणवीर सिंग साकारणार आहे तर औरंगजेबच्या भूमिकेत विकी कौशल दिसणार आहे.
या चित्रपटात आलिया भट्ट, भूमी पेडणेकर, करीना कपूर खान, जान्हवी कपूर आणि अनिल कपूर यांच्या प्रमुख भूमिका आहेत.