मुंबई -दाक्षिणात्य सुपरस्टार 'बाहुबली' फेम प्रभास 'साहो' चित्रपटाच्या निमित्ताने बॉलिवूडमध्ये एन्ट्री करत आहे. २९ ऑगस्टला हा चित्रपट प्रदर्शित होतोय. त्यामुळे सध्या प्रभास आणि श्रद्धा कपूर दोघेही चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहेत. अलिकडेच दोघांनीही 'द कपिल शर्मा शो'मध्ये हजेरी लावली होती. यावेळी कपिलने प्रभासचे पूर्ण नाव घेतले. त्याचे पूर्ण नाव ऐकुन चाहतेही हैराण झाले.
प्रभासच्या चाहत्यांना त्याचे पूर्ण नाव माहिती नाही. कारण, चित्रपटांमध्ये फक्त प्रभास एवढंच नाव पडद्यावर पाहायला मिळतं. कपिल शर्माने मात्र, त्याचे पूर्ण नाव घेत मजेशीर अंदाजात त्याचे कार्यक्रमात स्वागत केले.
'व्यंकटेश सत्यनारायणा प्रभास उप्पलपत्ति', असे प्रभासचे पूर्ण नाव आहे. 'हे नाव पाच व्यक्तीचं नसून फक्त एकाच व्यक्तीचे नाव आहे जो पाच स्टार्स समान आहे', असे म्हणत कपिलने प्रभासचं स्वागत केलं.