महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

मुलीची वेदना पाहून धाय मोकलून रडला 'केजीएफ'चा रॉकस्टार - Radhika

केजीएफ सुपरस्टार रॉकीला अश्रू अनावर झाले. मुलीला होणाऱ्या वेदना त्याला सहन झाल्या नाहीत. त्याची पत्नी राधिकाने हा खुलासा केला आहे.

केजीएफ स्टार यश

By

Published : Aug 28, 2019, 8:47 AM IST


केजीएफ या सुपरहिट चित्रपटाचा नायक यश मुलीचे दुःख पाहून धायमोकलून रडला. यश आणि राधिकाची मुलगी आर्या हिचा अलिकडेच कान टोचण्यात आला. कान टोचताना आर्याला वेदना होऊन ती मोठ्याने रडायला लागली. हे पाहून बापाच्या काळजाला पाझर फुटला आणि तोही रडायला लागला. ही माहिती यशची पत्नी राधिका पंडित हिने इन्स्टाग्रामवर दिली आहे.

अलिकडेच यशची पत्नी राधिका पंडितने सोशल मीडियावर पोस्ट लिहिली. या मुलीच्या कान टोचण्याची वेदना यशला कशी सहन झाली नाही याचा उल्लेख तिने केलाय. तिने मुलीसोबतचा फोटोही शेअर केलाय.

या फोटोखाली राधिकाने लिहिलंय, आम्ही आर्याचे कान टोचले. कोणत्याही पालकाच्या आयुष्यातील हे सर्वात कठिण काम असते. तिला रडताना पाहून आमचे काळीज तुटले. पहिल्यांदा मी रॉकिंग स्टारच्या डोळ्यात अश्रू पाहिले. आयुष्यात नाती किती अनमोल असतात हे पाहून समजले. आता काळजीचे कारण नाही, बाब आणि मुलगी आता ठिक आहेत.

'केजीएफ (KGF)' हा चित्रपट यशचा सर्वात यशस्वी चित्रपट ठरला होता. यात त्याने रॉकी ही व्यक्तीरेखा साकारली होती. या चित्रपटाचा दुसरा भागही प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट हिंदीतही प्रदर्शित झाला होता.

ABOUT THE AUTHOR

...view details