महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

समुद्रातील गनिमीकाव्याचे जनक कान्होजी आंग्रे यांची जीवनगाथा येणार पडद्यावर - भारताचे पहिले नौदल प्रमुख कान्होजी आंग्रे

भारताचे पहिले नौदलप्रमुख म्हणजेच सरखेल कान्होजी आंग्रे यांच्या जीवनावर आधारित चित्रपट बनणार आहे. कान्होजी आंग्रे यांची शौर्यगाथा ही प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचावी, या उद्देशाने २०२२मध्ये या चित्रपटाची टीम हा चित्रपट प्रेक्षकांसाठी घेऊन येणार आहे.

Kanhoji Angre's life story will come on screen
कान्होजी आंग्रे यांची जीवनगाथा येणार पडद्यावर

By

Published : Jul 11, 2020, 5:31 PM IST

मुंबई - भारताचे पहिले नौदल प्रमुख ज्यांचा समुद्रातील शिवाजी म्हणून अखंड मुलखात परिचय होता, ज्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा मार्ग फक्त समुद्रालाच ठाऊक होता, असे भारताचे पहिले नौदलप्रमुख म्हणजेच सरखेल कान्होजी आंग्रे. कान्होजी आंग्रे यांची ख्याती क्रिएटीव्ह मदारीस प्रस्तुत राहुल जनार्दन जाधव यांच्या ’कान्होजी आंग्रे’ या चित्रपटामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे.

कान्होजी आंग्रे यांची जीवनगाथा येणार पडद्यावर

हेही वाचा - प्रियंका चोप्राने यापूर्वीच सुरू केलंय 'मॅट्रिक्स 4'चे शूटिंग ?

’कान्होजी आंग्रे’ या चित्रपटाचे लेखन डॉक्टर सुधीर निकम यांनी केले असून चित्रपटाचे पर्यवेक्षक निर्माते राहुल भोसले आहेत. अख्ख्या युरोपच्या नौसेनेला ज्यांची धास्ती होती. इंग्रज, डच, फ्रेंच, पोर्तुगीज एकत्र येऊन पण ज्यांचा पराभव करू शकले नाहीत, असे दर्या सारंग म्हणजेच कान्होजी आंग्रे. कान्होजी आंग्रे या चित्रपटाच्या निमित्ताने समुद्राच्या लाटा आणि समुद्रातील राजकारण अचूक हेरून सुरत ते दक्षिण कोकणचा किनारा एकट्याने सुरक्षित ठेवणाऱ्या या वीर समुद्रातील गनिमी काव्याचे जनक अशी ओळख असलेल्या प्रथम नौदल सैनिकाची कामगिरी प्रेक्षकांच्या नजरेस येणार आहे. कान्होजी आंग्रे यांची शौर्य गाथा ही प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचावी या उद्देशाने २०२२ मध्ये या चित्रपटाची टीम हा चित्रपट प्रेक्षकांसाठी घेऊन येणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details