महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

६०० रुपयाच्या साडीवरुन ट्रोल झालेल्या कंगनानं ट्रोलर्सला असं दिलं उत्तर - पंगा

काही दिवसांपूर्वी कंगनाचा विमानतळावरील लूक व्हायरल झाला होता. कंगनाची बहीण रंगोलीने तिचा हा फोटो शेअर करुन तिने यावेळी घातलेली साडी फक्त ६०० रुपयांची असल्याचं सांगितलं होतं.

६०० रुपयाच्या साडीवरुन ट्रोल झालेल्या कंगनानं ट्रोलर्सला असं दिलं उत्तर

By

Published : Aug 26, 2019, 8:31 AM IST

मुंबई -बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत ही नेहमी कोणत्या कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. तिचं वादग्रस्त वक्तव्य असो किंवा तिची स्टाईल स्टेटमेंट. बऱ्याचवेळा ती तिच्या स्पष्ट मतांमुळे चर्चेत असते. यावरुन ती कधी कधी ट्रोलही होते. मात्र, कंगना या ट्रोलर्सला सडेतोड उत्तर देताना पाहायला मिळते.

काही दिवसांपूर्वी कंगनाचा विमानतळावरील लूक व्हायरल झाला होता. कंगनाची बहीण रंगोलीने तिचा हा फोटो शेअर करुन तिने यावेळी घातलेली साडी फक्त ६०० रुपयांची असल्याचं सांगितलं होतं. मात्र, ट्रोलर्सनी कंगनाच्या इतर वस्तू या साडीपेक्षा महागड्या असल्याचं म्हणून तिला ट्रोल केलं होतं.
कंगनाने याबाबत म्हटले, की 'सिनेसृष्टीत बऱ्याचदा एकाचप्रकारचे कपडे परिधान केले तरीही ट्रोल केलं जातं. मी आनंदी आहे, की लोकांनी माझ्याकडे लक्ष दिलं. मात्र, लोकांनी वेगळ्या प्रकारच्या फॅशनलाही आत्मसात करावं. तसंच, रिसायकल कपड्यांवरुन ट्रोल करणंही थांबवावं'.

'फक्त ही साडी रोडसाईड दुकानातून घेतली आहे म्हणून ती खराब असेल, असं नाही. जेव्हा तुम्ही मोठ्या दुकानातून कपडे खरेदी करता, त्यामध्ये काही फरक नसतो', असेही ती पुढे म्हणाली.

कंगना लवकरच 'पंगा' आणि 'धाकड' चित्रपटांमध्ये झळकणार आहे. या चित्रपटांचे पोस्टरही प्रदर्शित झाले आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details