मुंबई - बऱ्याचदा एखाद्या चित्रपटासाठी दिग्दर्शक वेगवेगळ्या कलाकारांशी चर्चा करत असतात. मात्र, बरेचसे कलाकार हे आधीच दुसऱ्या कामात व्यग्र असल्याने काही चित्रपट करू शकत नाहीत. त्यांच्या जागी दुसऱ्या कलाकाराची वर्णी लागते. आता अनुराग बासूचा 'इमली' हा चित्रपट दीपिका पदूकोण करणार अशी चर्चा सध्या बॉलिवूडमध्ये सुरू आहे. यापूर्वी हा चित्रपट कंगना रनौत करणार होती. मात्र, आता तिने हा चित्रपट करण्यास नकार दिला आहे.
कंगनाने चित्रपट सोडल्यानंतर या चित्रपटात दीपिका पदुकोणच्या नावाची चर्चा सुरू आहे. तिच्याशी याबाबत दिग्दर्शकाने संपर्क साधला आहे. दीपिकालाही या चित्रपटाती कथा आवडली आहे. मात्र, याबाबत अद्याप तिने काहीही जाहिर केले नाही.