मुंबई -बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत आणि अभिनेता राजकुमार राव यांचा 'मेंटल है क्या' या चित्रपटाची बऱ्याच दिवसापासून चर्चा सुरू आहे. हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच अनेक वादविवादात अडकला आहे. अलिकडेच कंगनाने सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशनला (CBFC) भेट दिली. या त्यांच्या मिटिंगमध्ये या चित्रपटाच्या नावामध्ये आणि काही सिनमध्ये बदल करण्याचे सुचविण्यात आले आहेत. मात्र, या चित्रपटाच्या नावात अद्याप बदल झाला नाही. तरीही लवकरच या चित्रपटाला नवे नाव देण्यात येणार असल्याचे बोलले जात आहे.
एका माध्यमाने दिलेल्या वृत्तानुसार, या चित्रपटाची निर्मिती बालाजी मोशन पिक्चर्स अंतर्गत होत आहे. लवकरच निर्माते या चित्रपटाच्या नावाबाबत आपला निर्णय जाहीर करतील, असेही सांगण्यात येत आहे.
या चित्रपटाच्या शिर्षकामुळे हा चित्रपटात वादात अडकला आहे. इंडियन सायक्रॅटिक सोसायटी तर्फे प्रसून जोशी यांना याबाबत पत्र देखील पाठविण्यात आले होते. त्यात या शिर्षकावर आक्षेप घेण्यात आला होता.