महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

इतकी सुंदर होती कंगनाची बहिण, अ‌ॅसिड हल्ल्यानंतर बदललं रुप - Kangna ranaut sister rangoli

रंगोलीने तिचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोमध्ये ती खूपच सुंदर असल्याचं पाहायला मिळतं.

इतकी सुंदर होती कंगनाची बहिण, अ‌ॅसिड हल्ल्यानंतर बदललं रुप

By

Published : Oct 4, 2019, 8:32 AM IST

मुंबई - बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत आणि तिची बहिण रंगोली चंडेल दोघीही लाईमलाईटमध्ये चर्चेत असतात. कधी त्यांच्या वक्तव्यामुळे किंवा कोणावर तरी निशाणा साधल्यामुळे त्यांची चर्चा होत असते. मात्र, यावेळी कंगनाची बहिण रंगोलीने तिच्याबाबतीत घडलेल्या एका कठिण प्रसंगाच्या आठवणी ताज्या केल्या आहेत. तिने तिचे काही जुने फोटो शेअर करुन तिच्यावर झालेल्या अ‌ॅसिड हल्ल्यानंतर तिची काय अवस्था झाली होती, याबद्दल पोस्ट शेअर केली आहे.

रंगोलीने तिचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोमध्ये ती खूपच सुंदर असल्याचं पाहायला मिळतं. मात्र, याच फोटोनंतर तिने ज्या मुलाचं प्रपोजल नाकारलं होतं, त्याने तिच्यावर एक लिटर अ‌ॅसिड फेकलं होतं. या अ‌ॅसिड हल्ल्यानंतर आपल्या डोळ्यासमोर आपले अवयव जळताना पाहिले, असं रंगोलीनं या पोस्टमध्ये म्हटले आहे.

'आमच्या आईवडिलांनी सुंदर, हुशार आणि आत्मविश्वासी मुलींना जन्म दिला होता, म्हणून असं करण्यात आलं होतं. हे जग मुलींसाठी सुरक्षित नाही. समाजातील वाईट प्रवृत्तींशी आता लढण्याची वेळ आली आहे', असंही तिनं म्हटलं आहे.

हेही वाचा -बॉलिवूडचे सर्व विक्रम मागे टाकत 'वॉर' सिनेमाने रचला नवा इतिहास

पुढे तिने असंही लिहिलंय, की 'माझ्यावर ५४ पेक्षा जास्त शस्त्रक्रिया करण्यात आल्या होत्या. मात्र, तरीही डॉक्टर माझा कान निट करु शकले नाही. पुढे माझ्या मुलाच्या जन्मानंतर स्तनपान करताना होणारा त्रास किती वेदनादायी होता', हेही तिने या पोस्टमध्ये सांगितलं आहे.

या कठिण प्रसंगी कुटुंबाची आणि तिच्या पतीची तिला साथ लाभल्याचंही तिनं लिहिलं आहे. तसंच या धक्यातून सावरण्यासाठी कंगनानही मानसिक आधार दिल्याचं तिनं म्हटलं आहे.

हेही वाचा -'तेरी मेरी कहानी' नंतर हिमेश रेशमियाचं नवं गाणं सोशल मीडियावर व्हायरल, नेहा कक्करनेही शेअर केला व्हिडिओ

ABOUT THE AUTHOR

...view details