मुंबई -अभिनेत्री कंगना रनौत अलिकडेच 'पंगा' चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आली. आता या चित्रपटानंतर ती पुन्हा 'थलायवी' या बायोपिकच्या शूटिंगकडे वळली आहे. या चित्रपटात ती जयललिता यांच्या भूमिकेत दिसणार आहे. त्यासाठी ती तिच्या लुकवर विशेष मेहनत घेत आहे. तिच्या लुकवर मेहनत घेणाऱ्या हेअरस्टायलिस्ट मारिया शर्मा यांना बॉलिवूडमध्ये ५० वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यांच्यासोबतचा एक फोटो शेअर करुन कंगनाने त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
मारिया शर्मा यांनी तब्बल ५ दशकं बॉलिवूडमध्ये हेअरस्टायलिस्टचं काम केले आहे. हेलन, हेमा मालिनी, शर्मिला टागोर यांसारख्या बऱ्याच अभिनेत्रींच्या लुकवर त्यांनी काम केले आहे. कंगनाने त्यांच्यासोबत 'वो लम्हे' आणि 'वन्स अपॉन अ टाईम इन मुंबई' याही चित्रपटांसाठी काम केले आहे.
हेही वाचा -'पृथ्वीराज' चित्रपटातील गाण्याचे शूटिंग पूर्ण, मानुषीने शेअर केली झलक