महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

'पंगा'ची तयारी सुरू, कबड्डी खेळताना दिसली कंगना - social media

विविधांगी भूमिका साकारून तिला योग्य तो न्याय देणे यामूळेच कंगना आज बॉलीवूडमधील यशस्वी अभिनेत्रींमध्ये गणल्या जाते. 'पंगा' या चित्रपटाच्या निमीत्ताने कंगना आपल्या करिअरमधील मैलाचा दगड गाठण्यास तयार आहे.

कंगनाची 'पंगा' साठीची तयारी जोरात...

By

Published : May 30, 2019, 10:01 AM IST

मुंबई - बॉलीवूडची 'क्विन' कंगना 'पंगा' चित्रपटाच्या निमीत्ताने पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या हृदयावर आपल्या अभिनयाची छाप सोडण्यास सज्ज आहे. या चित्रपटात कंगनाने 'कबड्डी खेळातील खेळाडू' ची भूमिका साकारली आहे. यात तिच्या सोबत पंजाबी गायक जस्सी गिल, नीना गुप्ता आणि रीचा चड्ढा हे कलाकारही दिसणार आहेत.

चित्रपटाच्या दिग्दर्शक 'अश्विनी अय्यर' यांनी ट्विटरच्या माध्यमाने पडद्यामागील काही चित्रे पोस्ट केली आहेत. यामध्ये कंगना तिच्या सहकलाकारांबरोबर दिसत आहे. या फोटोवर अश्विनीने 'वी आर गियरिंग अप' असं फोटो कॅप्शन ही दिले आहे.

'पंगा' चित्रपटाच्या भूमिकेसाठी कंगना दोन महीन्यांचे कबड्डीचे प्रशिक्षणही घेणार आहे. हा चित्रपट पुढील वर्षी २४ जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येईल.
कंगनाचा 'मनिकर्णिका - द क्विन ऑफ झांसी' हा चित्रपट काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झाला होता. यामध्ये तिने राणी लक्ष्मीबाईची भूमिका साकारली होती. सध्या तिचा 'मेंटल है क्या' हा चित्रपट २६ जुलै ला प्रदर्शित होत आहे. यात तिने राजकुमार राव बरोबर भूमिका साकारली आहे.

येत्या काळात कंगना एल. विजय यांच्या बिग बजेट चित्रपटात काम करणार आहे. हा चित्रपट तमिळनाडूच्या माजी मूख्यमंत्री जयललिता यांच्यावर आधारित आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details