मुंबई -अभिनेत्री कंगना रनौत 'जजमेंटल है क्या' चित्रपटानंतर आता 'धाकड' चित्रपटासाठी सज्ज झाली आहे. सायको थ्रिलर असलेल्या 'जजमेंटल है क्या' चित्रपटातील तिच्या भूमिकेचे सर्वांनी प्रशंसा केली. कंगनाला तिच्या भूमिकेत नवनविण प्रयोग करायला आवडतात. त्यामुळे आता ती पुन्हा एकदा अनोख्या अंदाजात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
कंगनाच्या आगामी 'धाकड' चित्रपटाची घोषणा काही महिन्यांपूर्वीच करण्यात आली होती. या चित्रपटाचे फर्स्ट लूक पोस्टरही प्रेक्षकांना पाहायला मिळाले. पोस्टरमध्येच कंगनाचा जबरदस्त लूक पाहायला मिळाला होता. आता या चित्रपटाचा फर्स्ट लूक टीजर प्रदर्शित करण्यात आला आहे. हा टीजर पाहून तुमच्याही अंगावर काटा येईल.