हैदराबाद : गंगूबाई काठियावाडीच्या रिलीजपूर्वी, अभिनेत्री कंगना रणौतने ( Gangubai Kathiawadi ) या चित्रपटावर खोचकपणे टीका केली. शुक्रवारी गंगूबाई काठियावाडीच्या रिलीजमुळे "200 कोटी रुपये जळून राख होतील", असे सांगत तिने आलिया आणि चित्रपटाची खिल्ली उडवली.
रविवारी सकाळी, कंगनाने इंस्टाग्राम स्टोरीजवर आलिया आणि तिच्या आगामी चित्रपटावर तिने टीका केली. गंगूबाई काठियावाडी आणि आलियाबद्दल कंगनाने लिहिले, "या शुक्रवारी बॉक्स ऑफिसवर 200cr जळून राख होतील. रोमकॉम बिम्बो अभिनय करू शकतो हे सिद्ध करण्यासाठी एक पापा (चित्रपट माफिया डॅडी) की परी (ज्याला ब्रिटिश पासपोर्ट ठेवायला आवडते) असेही तिने सांगितले.' "चित्रपटाचा सर्वात मोठा दोष म्हणजे चुकीची कास्टिंग. ये नहीं सुधरेंगे. दक्षिण आणि हॉलीवूड चित्रपट मोठ्या पडद्यावर जाणे यात काही आश्चर्य नाही." असे सांगत चित्रपट माफियांची सत्ता येईपर्यंत "नशिबातच" असल्याचे म्हटले.
हेही वाचा -आलिया भट्टपासून समंथापर्यंत, १५ सेलिब्रिटींचे बाथटब फोटो!