मुंबई : राम नवमी निमित्ताने आपल्या चाहत्यांना शुभेच्छा देताना कंगना रानौतने राम हे आपल्या संस्कृतीतील सर्वात महत्तवाचे प्रतीक असल्याचे म्हटले आहे.
कंगनाची बहिण रंगोली चंदेलने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये कंगना आपल्या चाहत्यांना विचारते की, “तुम्हाला कधी असा विचार आला आहे की, राम आपल्या देशातील सर्वात महत्वाचा मनुष्य का आहे, कारण ते कृष्णासारखे प्रगल्भ नाहीत किंवा शिवा सारखे सर्वव्यापी नाहीत.''
रामाविषयी आपले विचार मांडताना कंगना पुढे म्हणते, "राम हा एक नीतिमान मनुष्य आहे, ज्याने आपल्या आयुष्यात आणि प्रयोगांद्वारे बलिदान म्हणजे काय या विषयी आपल्याला जागरुक केले.''
यानंतर तिने ल्महे चित्रपटाच्या शूटींगनंतर तिला धुम्रपानाची सवय कशी लागली याबद्दल सांगितले. यात धुम्रपान करणाऱ्या व्यक्तीची भूमिका तिने साकारली होती. त्यावेळी तिचे वय १९ वर्षांचे होते.
परंतु नंतर 'बलिदान'ची संकल्पना अंमलात आणत तिने धुम्रापान कमी केले. याबद्दल बोलताना ती म्हणाली की, ही संकल्पना तिच्या वाढीस मदत कारक ठरली. याचाच उपयोग तिला आजचे आयुष्य जगताना होतोय.