मनाली(हिमाचल प्रदेश)- अभिनेत्री कंगना रणौत गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. कंगनाने पुन्हा एकदा बॉलिवूडवर जहरी टीका केली आहे. बॉलिवूडची तुलना तिने विषारी गटाराशी करताना तिने बॉलिवूडमध्ये ड्रग्स, शोषण, इंडस्ट्रीतील कंपूशाही संपवण्याऐवजी माझ्यावरच खटले दाखल करत आहेत, असा आरोप केला आहे. आपण जिवंत असेपर्यंत या सर्व गोष्टी उघडकीस आणत राहील, असेही तिने म्हटले आहे.
बॉलिवूडचा जुना कायदा आहे की, तुम्ही माझी रहस्ये दडवून ठेवा आणि मी देखील तुमची रहस्ये लपवून ठेवते. लहानपणापासून तिने बॉलीवूडमधील मोजक्याच कुटुंबांना इंडस्ट्री चालवताना पाहिले आहे आणि असे कसे चालेल, असे कंगनाने ट्विटमध्ये म्हटले आहे. बीएमसीने तिच्या ऑफिसच्या केलेल्या तोडफोडीवरून तिच्या मित्रांना आणि चाहत्यांना दु:ख झाल्याचे देखील तिने ट्विट करून सांगितले आहे.