कंगना रनौतच्या 'पंगा' चित्रपटाचा फर्स्ट लूक रिलीज - मणिकर्णिका
बॉलिवूड 'क्विन' कंगना रनौत हिचा अलिकडेच 'मणिकर्णिका' हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाच्या यशानंतर तिचा आगामी 'पंगा' चित्रपटही प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाच्या शूटिंगलाही सुरुवात झाली आहे. नुकताच या चित्रपटाचा पहिला लूक प्रदर्शित करण्यात आला आहे.
मुंबई - बॉलिवूड 'क्विन' कंगना रनौत हिचा अलिकडेच 'मणिकर्णिका' हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाच्या यशानंतर तिचा आगामी 'पंगा' चित्रपटही प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाच्या शूटिंगलाही सुरुवात झाली आहे. नुकताच या चित्रपटाचा पहिला लूक प्रदर्शित करण्यात आला आहे.
'पंगा' चित्रपटाचे दिग्दर्शन अश्विनी अय्यर तिवारी या करत आहेत. त्यांनीच सोशल मीडियावर या चित्रपटाचे पोस्टर शेअर केले आहे. या चित्रपटात निना गुप्ता आणि रिचा चढ्ढा या अभिनेत्री देखील मुख्य भूमिका साकारणार आहेत.
'आयुष्य हे आपल्याला मिळालेली दुसरी संधी आहे', असे कॅप्शन या फोटोवर देण्यात आले आहे.