मुंबई -अभिनेत्री कंगना रणौतने बुधवारी सकाळी तिच्या मेक्सिको प्रवासातील एक थ्रोबॅक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. समुद्राच्या काठावर वाळूत पाठमोरी बसलेली कंगना यात दिसते. चाहत्यांनी यावर भरपूर प्रतिक्रिया द्यायला सुरूवात केली आहे. त्यामुळे कंगना सोशल मीडियावर चांगलीच ट्रोल झाली आहे. यावर नेटकऱयांना कंगनाने आणखी एका पोस्टने प्रत्युत्तर दिले आहे.
कंगनाचे ट्रोलकर्त्यांना पोस्टद्वारे प्रत्युत्तर
कंगनाने केलेल्या दुसऱया पोस्टमध्ये आपल्या बिकिनी फोटोचा उल्लेख केला आहे. त्यावर तिने कट्टर हिंदूत्ववाद्यांना आणि सनातन विचारसरणीच्या लोकांना धारेवर धरले आहे. यावर बोलताना कंगना म्हणते, काही लोकं माझा बिकिनीतला फोटो बघून मला धर्माचे ज्ञान देत आहेत. समजा कधी देवी भेरवी आपले केस मोकळे सोडून विवस्त्र.. दुष्टांचं मर्दन करणाऱ्या रुपात समोर आली असती तर मग अशावेळी तुमचे काय होईल? तुम्ही स्वत:ला भक्त समजत आहात. धर्माचे पालन करा. त्याचे ठेकेदार होऊ नका... जय श्रीराम.
सुरुवातीला केलेली पोस्ट