महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

कंगनाची बहिण रंगोलीचा आता 'देसी गर्ल'वर वार, वाचा काय म्हणाली? - climate change summit

अलिकडेच १६ वर्षीय ग्रेटा थनबर्ग हिने वातावरण बदलांसंबधीत आयोजित समिटमध्ये आपल्या वक्तव्यानं सर्वांचं लक्ष वेधलं होतं. तिच्या भाषणाचं सर्वचं क्षेत्रातून कौतुक झालं होतं. प्रियांका चोप्रा हिनेही तिची प्रशंसा करत एक ट्विट केलं होतं.

कंगनाची बहिण रंगोलीचा आता 'देसी गर्ल'वर वार, वाचा काय म्हणाली?

By

Published : Sep 27, 2019, 1:12 PM IST

मुंबई -अभिनेत्री कंगना रनौत नेहमी तिच्या वक्तव्यामुळे लाईमलाईटमध्ये असते. आता तिच्या पाठोपाठ तिची बहिण रंगोली चंडैल ही देखील आपल्या ट्विटमुळे चर्चेत असते. बॉलिवूडच्या बऱ्याच कलाकारांना ती धारेवर धरते. मात्र, यावेळी तिने थेट प्रियांका चोप्रावर निशाणा साधला आहे.

अलिकडेच १६ वर्षीय ग्रेटा थनबर्ग हिने वातावरण बदलांसंबधीत आयोजित समिटमध्ये आपल्या वक्तव्यानं सर्वांचं लक्ष वेधलं होतं. तिच्या भाषणाचं सर्वचं क्षेत्रातून कौतुक झालं होतं. प्रियांका चोप्रा हिनेही तिची प्रशंसा करत एक ट्विट केलं होतं. 'पर्यावरणाची काळजी घेण्याची आपल्या सर्वांचीच जबाबदारी आहे. तू तुझ्या वक्तव्यातून याची सर्वांना जाणीव करुन दिली. तुझी आभारी आहे, की तू तुझ्या भाषणाद्वारे सर्वांच्याच तोंडात चपराक मारली आहे. आपल्याजवळ हा फक्त एकच ग्रह आहे. याची काळजी घ्यायलाच हवी', असं प्रियांकानं तिच्या ट्विटमध्ये लिहिलं होतं.

प्रियांकाच्या या ट्विटला प्रत्युत्तर देत कंगना रनौतची बहीण रंगोली हिने देखील एक ट्विट केलं. 'प्रिय प्रियांका चोप्रा. होय, ही मुलगी खूप चांगलं काम करत हे. मात्र, आपल्या देशातही असे बरेच लोक आहेत, जे पर्यावरणाच्या संवर्धनासाठी प्रयत्न करत आहेत. ते फक्त भाषण देत नाहीत, त्याचा परिणामही दाखवून देत आहेत. त्यांच्यासाठीही काही चांगलं लिहिलं तर, चांगलं वाटेल', असं तिनं तिच्या ट्विटमध्ये लिहिलं आहे.

हेही वाचा -'धकधक गर्ल'सोबत 'देसी गर्ल'चा धमाल 'पिंगा', पाहा व्हिडिओ

ग्रेटाची प्रशंसा करणाऱ्यांमध्ये प्रियांकाच नाही, तर, आलिया भट्ट, सोनम कपूर, अनुष्का शर्मा, वरुण धवन या कलाकारांनीही तिची प्रशंसा केली होती.

कोन आहे ग्रेटा थनबर्ग -
स्वीडन येथील असलेली अवघ्या १६ वर्षांची ग्रेटा ही पर्यावरणाच्या संवर्धनासाठी कार्य करते. तिला 'राईट लाइवलीहुड अवार्ड', या पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आली आहे. याशिवाय तिला 'नोबेल' पुरस्कारासाठीही नामांकन मिळालं आहे. जर तिला हा पुरस्कार मिळाला, तर ती हा पुरस्कार मिळवणारी सर्वात तरुण युवती ठरेल.

हेही वाचा -प्रतिनोबेल म्हणून ओळखला जाणारा 'राईट लाईव्हलीहूड' पुरस्कार 16 वर्षीय ग्रेटा थनबर्गला जाहीर

ABOUT THE AUTHOR

...view details