महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

'फिरसे पंगा लेना है', पाहा कंगनाच्या 'पंगा' चित्रपटाचा ट्रेलर - neena gupta in panga

कौटुंबिक जबाबदारीआणि खेळाबद्दलचे प्रेम यांच्यामध्ये अडकलेल्या महिलेची ही कथा आहे.

Kangana Ranaut satrer panga trailer release
'फिरसे पंगा लेना है', पाहा कंगनाच्या 'पंगा' चित्रपटाचा ट्रेलर

By

Published : Dec 23, 2019, 7:20 PM IST

मुंबई - बॉलिवूडची क्विन कंगना रनौत पुन्हा एकदा 'पंगा' घेण्यासाठी सज्ज झाली आहे. चित्रपटाच्या फर्स्ट लूकनंतर प्रेक्षकांना या चित्रपटाच्या ट्रेलरची आतुरता होती. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे.

कंगना रनौत या चित्रपटात कबड्डी खेळाडुच्या भूमिकेत दिसणार आहे. एकेकाळी कब्बडी चॅम्पियन असलेली महिला लग्न झाल्यानंतर घर-संसारात रमलेली असते. मात्र, अचानक तिला पुन्हा तिच्या अस्तित्वाची जाणीव होते. यासाठी तिला तिचा पती आणि मुलाचीही साथ लाभते. वयाच्या ३२ व्या वर्षी पुन्हा देशासाठी ती कब्बडी खेळण्यासाठी सज्ज होते. तिचा हा प्रवास 'पंगा'च्या माध्यमातून पडद्यावर उलगडणार आहे.

हेही वाचा -'या' स्थानकात तिकीट वाटप करून कंगनाचे 'पंगा' प्रमोशन

कौटुंबिक जबाबदारीआणि खेळाबद्दलचे प्रेम यांच्यामध्ये अडकलेल्या महिलेची ही कथा आहे. यामध्ये कंगना 'जया'च्या भूमिकेत दिसणार आहे. जस्सी गील हा तिच्या पतीच्या भूमिकेत तर नीना गुप्ता तिच्या आईच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे.

अभिनेत्री रिचा चढ्ढाचीही महत्वपूर्ण भूमिका यामध्ये पाहायला मिळणार आहे. ती कंगनाच्या प्रशिक्षकाच्या भूमिकेत दिसेल.

हेही वाचा -भांगड्यानी होणार नववर्षाची सुरुवात, सनी कौशलच्या 'भांगडा पा ले'चा दुसरा ट्रेलर प्रदर्शित

अश्विनी अय्यर तिवारी यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. तर, फॉक्स स्टार स्टूडिओज अंतर्गत या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे. पुढच्या वर्षी २४ जानेवारीला हा चित्रपट प्रदर्शित होईल.

ABOUT THE AUTHOR

...view details