महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

माफी मागण्याऐवजी कंगना म्हणते, 'बिकाऊ, देशद्रोही पत्रकारांनी मला बॅन करावंच' - judgmental hai kya

कंगना आणि राजकुमार रावचा 'जजमेंटल है क्या' हा चित्रपट सध्या प्रदर्शनाच्या वाटेवर आहे. यातील एका गाण्याच्या निमित्ताने पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यादरम्यान कंगनाचा एका पत्रकाराशी वाद झाला होता.

माफी मागण्याऐवजी कंगना म्हणते, 'बिकाऊ, देशद्रोही पत्रकारांनी मला बॅन करावंच'

By

Published : Jul 11, 2019, 6:08 PM IST

मुंबई -अभिनेत्री कंगना रनौत नेहमी तिच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असते. बॉलिवूडमधील कोणत्या ना कोणत्या कलाकारावर ती निशाणा साधत असते. मात्र, यावेळी तिने पत्रकारांनाच थेट आव्हान दिले आहे. कंगनाची बहीण रंगोली चंडेल हिच्या ट्विटर अकाऊंटवरून कंगनाचा एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे.

काही दिवसांपूर्वीच तिने 'जजमेंटल है क्या' चित्रपटाच्या 'वखरा' गाण्याच्या लॉन्चिंगदरम्यान तिचा पत्रकांरांशी वाद झाला होता. या वादानंतर तिने एकतर पत्रकारांची माफी मागावी नाहीतर तिच्यावर पत्रकार संघटनेतर्फे बहिष्कार टाकण्यात येईल, अशी भूमिका पत्रकार संघटनेनी घेतली होती. मात्र, कंगनाने व्हिडिओद्वारे पत्रकारांना देशद्रोही आणि बिकाऊ, असे म्हटले आहे.
या व्हिडिओत कंगना चांगलीच भडकलेली दिसत आहे. तिने यामध्ये म्हटलेय, की 'मी काही समाजसेवेची कामे केली आहेत, त्याची दखल या पत्रकारांनी न घेता त्याची खिल्ली उडवली. स्वत:ला लिबरल सेक्युलर म्हणवणारे हे पत्रकार ढोंगी आणि बिकाऊ आहेत, असे ती म्हणाली आहे.

अशा पत्रकारांना आपण किंमत देत नाही, त्यांनी आता माझ्यावर बंदी घालूनच दाखवावी, असे आव्हानच तिने या व्हिडिओद्वारे दिले आहे. तिचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

कंगना आणि राजकुमार रावचा 'जजमेंटल है क्या' हा चित्रपट सध्या प्रदर्शनाच्या वाटेवर आहे. यातील एका गाण्याच्या निमित्ताने पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यादरम्यान कंगनाचा एका पत्रकाराशी वाद झाला होता. या वादानंतर 'एन्टरटेनमेंट जर्नालिस्ट्स गिल्ड ऑफ इंडिया'ने कंगनाने माफी मागावी, असा पवित्रा घेतला होता. मात्र, कंगनाने या व्हिडिओतून पत्रकारांवरच निशाणा साधला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details