मंडी (हिमाचल प्रदेश) - बॉलीवूड अभिनेत्री कंगना राणौतचा भाऊ अक्षत याचे लग्न नुकतेच पार पडले. कंगना तिच्या भावाच्या लग्नात खूप एंजॉय करताना दिसून आली. कंगनाने हळदी समारंभ, संगीत आणि लग्नातील सर्व फोटो तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत. नुकताच कंगनाचा एक व्हिडिओ खूप व्हायरल होत आहे. यामध्ये ती तिच्या वहिनीसोबत डांस करताना दिसून येत आहे.
कंगानाला आवडतात लोकसंगीत -
या व्हिडिओला कंगनाने तिच्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केला आहे. या व्हिडिओत कंगना साडी आणि हिमाचली शॉल आणि टोपी घालून दिसून येत आहे. व्हिडिओ शेअर करताना कंगनाने लिहिलंय की, मला कोणत्याही परंपरेचे लोकसंगीत खूप आवडते. हे कांगडी गाणं असून ते एका पहाडी कलाकाराने माझ्या भावाच्या लग्नात गायलं होतं.