मुंबई - कंगना रनौत सध्या 'मणिकर्णिका'चे यश अनुभवत आहे. याच पार्श्वभूमीवर चित्रपटाच्या सक्सेस पार्टीचे आयोजन तिने केले होते. तिच्या वादग्रस्त वक्तव्यासाठी ती ओळखली जाते. यावेळी तिने रणबीर कपूरला आपले टार्गेट करीत त्याच्यावर निशाणा साधला. राजकीय भाष्य करण्यापासून अलिप्त राहणाऱ्या फिल्म इंडस्ट्रीतील लोकांच्यावर तिने जबरदस्त हल्ला चढवला.
कंगना म्हणाली, "ते म्हणतात की राजकारणाबद्दल आम्ही का बोलायचे? आम्ही काय केले आहे? असे चालत नाही, तुम्हाला जबाबदार व्हावे लागेल. रणबीर कपूर कोणाला तरी म्हणत होता की माझ्या घरी वीज पाणी येते तर मग मी राजकारणाबद्दल का बोलू? देशामुळेच तुमचे घर आहे. तुम्ही ज्या मर्सिडिजमध्ये बसता तो या देशाचाच पैसा आहे. तुम्ही अशा प्रकारचे बोलूच कसे शकता ?"