मुंबई - सध्या हिवाळ्याचे दिवस सुरू झाले आहेत. हिवाळा हा ऋतू पर्यटनासाठी अतिशय चांगला समजला जातो. बॉलिवूडचे बरेच कलाकार आपल्या कामामधुन विश्रांती घेऊन वेगवेगळ्या ठिकाणी थंडीचा आनंद घेतात. अभिनेत्री कंगना रनौत ही थंडीचा आनंद घेण्यासाठी हिमालयात रवाना झाली आहे. तर, करिश्मा कपूर देखील आपल्या कुटुंबासोबत स्वित्झर्लँडमध्ये रवाना झाली आहे. सोशल मीडियावर त्यांनी आपले फोटो शेअर केले आहेत.
कंगनाची बहिण रंगोली चंडेल हिने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर काही फोटो पोस्ट केले आहेत. यामध्ये कंगना रनौत आणि तिचे कुटुंबीय पहाडी शहरांमध्ये धमाल करताना दिसतात.
हेही वाचा -बॉलिवूड २०२० : नववर्षात 'हे' चित्रपट देतील बॉक्स ऑफिसवर टक्कर
'हिमालय खूप सुंदर आहे. आमच्या पहाडांची सुंदरता ही वेगळीच आहे', असे कॅप्शन तिने या फोटोंवर दिले आहेत.